dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अखेर राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय: २२ सप्टेंबरला मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, लोकनेते राहुल बोंद्रे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. २२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत आपल्या प्रदीर्घ काँग्रेसमधील राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. राजकीय वाटा वेगळ्या पण नाती आणि आदर कायम राहणार असल्याचे राहुल बोंद्रे यांनी सांगितले.

आपल्या मनोगतात राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस पक्षाने सामाजिक व राजकीय वाटचालीत आपल्याला अनेक संधी आणि पदे दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर या प्रवासात मिळालेली जिवाभावाची माणसे हीच आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पक्षाने दिलेल्या प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून आपणही अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने पक्षासाठी अहोरात्र मेहनत केल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचा विशेष उल्लेख करताना त्यांनी ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. वासनिक यांनी राजकीय वाटचालीची सुरुवात करून दिली, प्रेम आणि मार्गदर्शन केले, त्यामुळे त्यांचे ऋण आयुष्यभर विसरणार नसल्याचे राहुल बोंद्रे यांनी सांगितले. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भावाप्रमाणे आणि मित्राप्रमाणे प्रेम दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

आपल्या वैचारिक भूमिकेचा संदर्भ देताना राहुल बोंद्रे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो धर्मपरिषदेतील विचारांचा उल्लेख केला. वेगवेगळे मार्ग शेवटी एका ठिकाणी येतात, अशी भावना व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना, संविधान आणि त्यांचे विचार यांच्याबद्दलचे प्रेम आपल्या मनात कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top