dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘वंदे मातरम्’वरुन वाद! : देशाची माफी मागावी : गृहमंत्री अमित शाह यांचा सोनिया गांधींवर घणाघात

चित्तोडगड : स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम’चे गायन मध्येच थांबवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. भाजपने केलेला हा दावा काँग्रेसने फेटाळून लावला. भाजपकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. या मुद्द्यावरुन वाद पेटला आहे. भाजपने या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी सोनिया गांधी यांच्याविरोधात आंदोलने करण्यात येत आहे.

चित्तोडगड : स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम’चे गायन मध्येच थांबवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. भाजपने केलेला हा दावा काँग्रेसने फेटाळून लावला. भाजपकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. या मुद्द्यावरुन वाद पेटला आहे. भाजपने या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी सोनिया गांधी यांच्याविरोधात आंदोलने करण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी, असे गृहमंत्र्यांनी म्हटले. 

अमित शाह यांनी रविवारी चित्तोडगडमधील जाहीर सभेत बोलताना ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि सोनिया गांधीवर घणाघात केला आहे. अमित शाह यांनी ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीकास्त्र डागले. काँग्रेसला या प्रकरणावरुन लाज वाटायला हवी, अशा शब्दात शाह यांनी हल्लाबोल केला. तसेच सोनिया गांधी यांनी देशवासियांची माफी मागायला हवी, अशी मागणी अमित शाह यांनी केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ‘वंदे मातरम’चे पूर्ण गायन होऊ दिले नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. 

काँग्रेसने आरोप फेटाळला

‘वंदे मातरम्’ चे पूर्ण रूप गाण्यापासून रोखण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले. तसेच, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काही काळ उभे असल्याने त्यांच्यासाठी खुर्चीची मागणी सोनिया गांधी करत होत्या, असेही पक्षाने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top