dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पोलिसांची चूक मान्य; शिवानी कळमेकर प्रकरणात दोषींवर फौजदारी कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

जळगाव जामोद :   बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील शिवानी कळमेकर प्रकरणावर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार चर्चा झाली. या प्रकरणात पोलिसांनी केलेले काम अत्यंत लाजिरवाणे असल्याचे स्पष्ट शब्दांत मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहीत पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत निष्पाप कुटुंबाला मुलीच्या कथित हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा आरोप केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बेपत्ता मुलीचा शोध सुरू असताना एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. कोणताही वैज्ञानिक किंवा फॉरेन्सिक अहवाल न घेता तो मृतदेह शिवानी कळमेकरचाच असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी तिचे वडील आणि भावाला अटक केली. मात्र शिवानी स्वतः जिवंत पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर या तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी निलंबित करण्यात आले असून, ज्यांचा थेट दोष सिद्ध होईल. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करुन आवश्यकतेनुसार सेवेतून निष्कासितही केले जाईल. तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल. अज्ञात मृतदेहाची ओळख आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पटविण्याचे काम सुरू असून, या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top