dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खा. संजय दिना पाटील यांच्याविरुध्द पत्रकार संघटना आक्रमक

अकोलादेव :  शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च भाषा वापरत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पत्रकारात संतापाची लाट उसळली आहे. पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी टेंभूर्णी मराठी पत्रकार संघाच्या वतीने टेंभूर्णी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश राठोड, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्याकडे शुक्रवार, 26 जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टेंभूर्णी पत्रकार संघाने निवेदनात म्हटले आहे की, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीमुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट घाला घातला गेला आहे. लोकप्रतिनिधी पदावर असलेल्या व्यक्तीचे असे वर्तन निषेधार्ह असून, आम्ही सर्व पत्रकार या कृत्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करतो. पत्रकारांना धमकावणाऱ्या या लोकप्रतिनिधीविरुद्ध केवळ गुन्हाच दाखल करू नये, तर त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी देखील टेंभूर्णी पत्रकार संघाने केली आहे. याबाबत शासनाला तात्काळ कळवून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे. टेंभूर्णी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश राठोड यांना देण्यात आलेल्या निवेदनावर टेंभूर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख साबेर, तालुका उपाध्यक्ष विष्णू मगर, रावसाहेब अंधारे, बी. डी. सवडे, गजानन देठे, नसीम शेख, महमंद बायश, अलकेश सोमाणी, फकरू कुरेशी, अशोक पाबळे, सुनिल भाले, प्रल्हाद जाधव, सुनिल जोशी, प्रताप नवले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top