पाचपीरवाडी : गंगापूर शहरातील महाविद्यालये आणि बाजारपेठ परिसरात वाढणाऱ्या टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून महिला वर्ग आणि सामाजिक संघटनांनी आता थेट पोलीस प्रशासनाकडे दामिनी पथक तैनात करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही महिन्यांत शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळी आणि सायंकाळी बाजारात तरुणींची छेडछाड, विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत. यामुळे पालक आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. आम्हाला सुरक्षित वाटावे म्हणून गस्त वाढवावी.गंगापूरमध्येही दामिनी पथकाची कायमस्वरूपी नेमणूक करावी अशी मागणी अविष्कार पोलीस मित्र प्रकार संघटनेचा वतीने प्रीती संदीप मेहेरे, कावेरी गजानन पाहुणे, मनीषा सूर्यवंशी, सविता शहाणे, ज्योती नवले, संगीता बहिरट यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच गंगापूर शहरात दामिनी पथक तैनात झाल्यास टवाळखोरांवर त्वरित कारवाई होऊन महिलांना सुरक्षिततेची हमी मिळेल, असा विश्वास निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळातील महिलांनी व्यक्त केला आहे.