मालेगाव : वाहतूक तपासणीदरम्यान मालेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा तीनचाकी ऑटो पकडण्यात आला. ही कारवाई १४ जून रोजी मालेगाव-मेहकर मार्गावरील मेहकर बायपास येथे करण्यात आली.

मालेगाव : वाहतूक तपासणीदरम्यान मालेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा तीनचाकी ऑटो पकडण्यात आला. ही कारवाई १४ जून रोजी मालेगाव-मेहकर मार्गावरील मेहकर बायपास येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस अंमलदार महेश यलगया जाधव व उमेश म्हस्के हे अवैध वाहतुकीवर कारवाई करीत असताना त्यांना एमएच २८ टी ३८८४ क्रमांकाचा संशयित ऑटो मेहकरकडून येताना दिसला. वाहन थांबवून त्याचा तपशील चालान मशीनवर तपासला असता प्रत्यक्ष वाहन व रेकॉर्डमधील माहितीत तफावत आढळून आली. यानंतर चालक शेख सोहेल शेख शकील (वय २४, रा. मेहकर) याच्यासह वाहन ताब्यात घेऊन मालेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संशयित वाहनाबाबत कलम १२४ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन जप्त करण्यात आले आहे.
चालान मशीनवरील रेड अलर्टच्या आधारे अधिक तपास केला असता सदर वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. या वाहनाबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे भोसरी येथे २०१७ मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर चिंचोळकर करीत आहेत.