dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

परिस्थिती नाही बदलली तर… आधी करोना, मग युद्ध अन् आता इंधन संकट : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

अ‍ॅमस्टरडॅम :  आज मानवतेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. आधी कोरोना, मग युद्ध आणि आता ऊर्जा संकटाशी झुंजत आहे. हे दशक जगासाठी आपत्त्यांचे दशक बनले आहे. जर परिस्थिती बदलली नाही, तर गेल्या अनेक दशकांच्या कामावर पाणी फिरेल, अशी चिंता पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

अ‍ॅमस्टरडॅम :  आज मानवतेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. आधी कोरोना, मग युद्ध आणि आता ऊर्जा संकटाशी झुंजत आहे. हे दशक जगासाठी आपत्त्यांचे दशक बनले आहे. जर परिस्थिती बदलली नाही, तर गेल्या अनेक दशकांच्या कामावर पाणी फिरेल, अशी चिंता पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नेदरलँड्स दौऱ्यावर असून त्यांनी तिथे शनिवारी भारतीय समुदायाशी संवाद साधला. हेग येथील कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी म्हणाले की, जग अनेक आव्हानांचा सामना करत असताना भारत नवोन्मेष, आर्थिक विकास आणि जागतिक सहकार्य या क्षेत्रात एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. तसेच त्यांनी या दशकाला आपत्तींचे दशक म्हणूनही संबोधले. भारत ही तंत्रज्ञान आणि मानवता या दोन्हींवर आधारित संधींची भूमी आहे. भारत जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा पूर्ण मानवतेला त्याचा फायदा होतो. पण आज मानवतेसमोर अनेक मोठी आव्हानेही आहेत. सध्या आपण नव्या आव्हानांना तोंड देत आहोत. आता इंधन संकट आहे. आपण सर्व पाहतोय. ही परिस्थिती वेगाने नाही बदलली तर पुन्हा गरीबीच्या दलदलीमध्ये आपण ढकलले जाऊ, असेही मोदी म्हणाले.

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप देश

मोदी म्हणाले की, आजचा भारत मोठी स्वप्ने पाहत आहे. देशातील तरुणांना आता एआय आणि सेमीकंडक्टर उत्पादनासारख्या क्षेत्रांमध्ये भारताला पुढे न्यायचे आहे. भारत वेगाने बदलत आहे आणि तंत्रज्ञान व डिजिटल क्षेत्रात एक नवीन ओळख निर्माण करत आहे. भारत आता जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र बनले आहे. देशातील नवीन स्टार्टअप्स एआय, संरक्षण आणि अंतराळ यांसारख्या क्षेत्रांमध्ये चांगले काम करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top