dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जळगाव जामोद जवळ मिनी बसचा भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी, चालक फरार

जळगाव जामोद – तालुक्यातील सुनगाव गावासमोर बऱ्हाणपूर रोडवर एका भरधाव मिनी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली असून, या अपघातात एकाच कुटुंबातील ८ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. 

जळगाव जामोद : तालुक्यातील सुनगाव गावासमोर बऱ्हाणपूर रोडवर एका भरधाव मिनी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली असून, या अपघातात एकाच कुटुंबातील ८ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. 

       मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय गणपतसिंग बरडे (वय ४०, रा. खेडी, जि. बडवाणी, म.प्र.) हे आपल्या नातेवाईकांसह मिनी बस (क्रमांक म.प्र 46- 0963) ने प्रवास करत होते. दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास सुनगाव जवळील बऱ्हाणपूर रोडवर बसचालक जोगेंद्र शिवचंद राम (रा. बस्ती, उ.प्र.) याने वाहन अत्यंत भरधाव व निष्काळजीपणे चालवले. यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरच पलटी झाली .या अपघातामध्ये बसमधील  ज्योती मुकेश बरडे (वय २८, रा. दोंडवाडा)२. अक्षय मुकेश बरडे (वय १ वर्ष ५ महिने), कलाबाई रमेश बरडे (वय ३५), लक्ष्मण भावड्या (वय ५८,रा. निमखेडी), रमेश मनोज बरडे (वय ४६), कंदलीबाई वासकले (वय ७०), गणपत सिंग बर्डे (वय ७०) रा. खेडी, म.प्र.) हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, खामगाव येथे हलविण्यात आले आहे.फिर्यादी संजय बरडे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी चालक जोगेंद्र राम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर अपघाताचा पुढील तपास ठाणेदार नितीनकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top