dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात खामगावात काँग्रेसचे आंदोलन

खामगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे विधानं करून अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीं विरोधात आज दि.२८ एप्रिल रोजी खामगाव येथील एसडीओ कार्यालयासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला तसेच गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

प्रतिमेला जोडे मारून नोंदविला निषेध; गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी

खामगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे विधानं करून अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीं विरोधात आज दि.२८ एप्रिल रोजी खामगाव येथील एसडीओ कार्यालयासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला तसेच गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

         सर्वप्रथम काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एसडीओ कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून धीरेंद्र शास्त्री यांचा जाहीर निषेध केला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल व जिल्हा पोलिस अधिक्षक नागपूर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत आणि आपल्या आराध्य दैवताचा अपमान कोणताही शिवप्रेमी सहन करू शकत नाही. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अत्यंत चुकीचे वक्तव्य केले व छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रा.स्व.संघाचे सरसंघचालक  मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते. मात्र छत्रपतींचा अपमान होत असताना उपस्थित या सर्वांनी होत असलेल्या चुकीच्या घटनेला मुक संमती देत त्याचा विरोध न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली ही अत्यंत खेद जनक बाब आहे. या सर्वांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व त्यांना महाराष्ट्रात येण्यास व जाहीर कार्यक्रम घेण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी खामगाव काँग्रेस तालुका अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण, शहर अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, शहर कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ॲड. अशोक इंगळे, खामगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अचलेश्वर दिपके, जिल्हा संघटन सचिव अतुल सिरसाट, अमित तायडे, सचिन जैस्वाल, मनोज बोदळे, कैलास साबे, पांडुरंग राखोंडे, निलेश देशमुख, साहिल देशमुख, छोटु राजपूत, सौरभ रिछारिया, मुरलीधर विभुते, अक्षय शंकरवार, शांताराम तायडे, श्रीधर ढगे, गजानन चव्हाण, डॉ.प्रविण चोपडे, सोपान पाटील, मुरलीधर अंभोरे, पुरूषोत्तम रामेकर, विलास नवसागर, प्रमोद हिंगणे, प्रसन्न पाटील, अनिल ठाकरे, अजय कंकाळे, गोपाल हिंगणे, लोमेश भोयर, अमोल खत्री यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top