dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्यात अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तीची निर्घृण हत्या

जालना : जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीची अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवार, 27 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली आहे. मच्छिंद्र दराडे असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे गोंदेगावसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

गोंदेगाव हादरले;  55 वर्षीय मच्छिंद्र दराडे यांचा जागीच मृत्यू, पोलिसांचा तपास सुरू

जालना : जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीची अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवार, 27 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली आहे. मच्छिंद्र दराडे असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे गोंदेगावसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र दराडे हे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गोंदेगाव येथे आले होते. मात्र, अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत दगडाने वार केले. हल्ला इतका भीषण होता की दराडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर जालना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठवला असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

दराडे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. हा घातपात पूर्वीच्या वादातून झाला की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाल्याने गोंदेगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top