dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

साकिब हुसेनचा आयपीएलमध्ये दरारा;  72 चेंडूत एकही षटकार नाही!

हैदराबाद : क्रिकेटमधील टी-२० फॉर्मेट म्हणजे गोलंदाजांची ‘धुलाई’ आणि फलंदाजांची ‘दादागिरी’ हा एक अलिखित नियमच आहे. प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन करणारा हा खेळ गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरतो. नियमांपासून खेळपट्टीपर्यंत सारं काही फलंदाजांसाठीची पर्वणी असते, तरीही एखादा चिवट गोलंदाज हा चक्रव्यूह भेदतो आणि आपलं अस्तित्व सिद्ध करतो… हे सारं सांगण्याचे कारण म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये एका गोलंदाजाने तब्बल ७२ चेंडू टाकले असून एकही फलंदाज त्याला षटकार ठोकू शकलेला नाही.

आयपीएल २०२६ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या बिहारच्या साकिब हुसेनने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साकिबने आपल्या पहिल्याच सामन्यात २४ धावा देत ४ बळी टिपले आणि एक नवा इतिहास रचला. साकिब हा बिहारमधील गोपाळगंजचा रहिवासी आहे. २०२६ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला ३० लाख रुपयांना खरेदी केले. २०२४ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने  त्याला संघात घेतले होते, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला संघातून मुक्त करण्यात आले होते.

दिग्गजांच्या पंगतीत स्थान

२१ वर्षीय साकिब हुसेन आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. त्याने पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत अश्वनी कुमारसह संयुक्त पाचवे स्थान पटकावले . या यादीत अलझारी जोसेफ (६/१२), अँड्र्यू टाय (५/१७) आणि शोएब अख्तर (४/११) यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top