dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान ; आ.अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी | unseasonal rains

unseasonal rains : सोयगाव शिवारात अलीकडेच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

सोयगाव :  तालुक्यातील सोयगाव शिवारात अलीकडेच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

पाहणीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. वादळी वारा व गारपिटीमुळे उभ्या पिकांसह फळबागा आणि भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. मका, बाजरी आणि ज्वारी यांसारखी पिके आडवी पडल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आमदार सत्तार यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांचे नुकसान अचूक नोंदवून त्वरित शासनाकडे अहवाल सादर करावा, जेणेकरून मदत लवकर मिळेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकरराव काळे, शहरप्रमुख संतोष बोडखे, कुणाल राजपूत आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top