dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सोमवारपासून घुंगर्डे हादगाव येथे खंडोबा यात्रेला सुरुवात | Khandoba Yatra 

Khandoba Yatra : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील गल्हाटी नदीच्या काठी असलेल्या खंडोबा मंदीरात सोमवार, ६ एप्रिल पासून वार्षिक यात्रेला सुरुवात होणार आहे.

अंबड : तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील गल्हाटी नदीच्या काठी असलेल्या खंडोबा मंदीरात सोमवार, ६ एप्रिल पासून वार्षिक यात्रेला सुरुवात होणार आहे. चैत्र पंचमी निमित्ताने भरत असलेल्या या यात्रेसाठी घुंगर्डे हादगावसह परीसरातील अनेक गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 

नवसाला पावणारा देव म्हणून खंडोबा देवाची ख्याती आहे. निसर्गरम्य परिसर असल्यामुळे येथे भाविकांची कायम वर्दळ असते. यात्रेनिमित्त भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच सभामंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायत व विविध संस्थाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गाव मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली असून, दोन दिवस चालणाऱ्या या खंडोबा यात्रा उत्सवामध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत श्रींच्या  मूर्तीची पूजा व नंतर अभिषेक तसेच ४ ते ७ या वेळेत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल. रात्री दहा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडेल. पहाटे पाच वाजता लंगर तोडण्यात येईल. मंगळवार, ७ एप्रिल रोजी  कुस्त्यांची दंगल होईल. 

येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा यात्रेला पंचक्रोशीसह जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात.   मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अहिल्या नगर, इतर ठिकाणी कामानिमित्त गेलेले सर्वजण यात्रेसाठी हजेरी लावतात. गोंदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशिष खांडेकर यांनी यात्रेसाठी चोख बंदोबस्त राहणार असल्याची माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top