Ambedkar Jayanti Celebration Committee : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भीमनगर-भावसिंगपुरा सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती नुकतीच जाहीर करण्यात आली. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमोल साळवे यांची निवड करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भीमनगर-भावसिंगपुरा सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती नुकतीच जाहीर करण्यात आली. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमोल साळवे यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी नवनाथ तेजाड, रमेश हिवराळे यांची निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्ताने भीमनगर-भावसिंगपुरा परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. भीमनगर-भावसिंगपुरा सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी गोकुळ भुजबळ, निरज मगरे, दादाराव लोखंडे, मेघानंद जाधव, चंद्रकांत दळवी, दादाराव राऊत, संदीप बनसोडे, स्वागताध्यक्षपदी मिलिंद दाभाडे, नगरसेवक गणेश लोखंडे, करुणा जाधव, विजय निकाळजे, महासचिवपदी बेंजामिन चांदणे, सचिवपदी सुरेश भगत, विनायक काळे, सहसचिवपदी अमित घनघाव, कुणाल राऊत, नितिन बचके, कोषाध्यक्षपदी भाऊसाहेब बचके, निखिल चांदणे, सहकोषाध्यक्षपदी सतिष साळवे, विजय काळे, सल्लागारपदी महेश तांबे, पी.के.दाभाडे, संजय वानखेडे, अँड. संतोष लोखंडे, रामभाऊ म्हस्के, गिरजाअण्णा लोखंडे, शिरसाठ, विनोद साबळे, डॉ.अविनाश सोनवणे, एकनाथ वारे, राहुल शिरसाठ, अविनाश सोनवणे, आयोजकपदी दगडू खडसन, जी.एन.खंडागळे, साहेबराव रोडगे, अशोक खरात, कडुबा तुपे, संदीप अहिरे, सुशिल भालेराव, जयपाल दवणे, प्रकाश सातदिवे, छोटू चांदणे, अनिल घोरपडे, आनंद भामरे, विजय खोतकर, शिवाजी नाडे, अर्जुन मगरे, संजय दांडगे, संजय धनेधर, विशाल धिवरे, पप्पू म्हस्के, अरुण कांबळे, दादू कांबळे, सुनिल राऊत, शिंदे, बाबासाहेब आमराव, प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, प्रमोद प्रधान, मनिष आवटे यांची यावेळी निवड करण्यात आली.


