dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गोमांस’ प्रकरण फुसके; जालन्यात जप्त मांस निघाले म्हशीचे | Jalna turns out to be buffalo

Jalna turns out to be buffalo : दोन दिवसांपूर्वी मोठ्या गाजावाजात जप्त करण्यात आलेल्या मांसप्रकरणात नाट्यमय वळण आले असून, संबंधित तीन कंटेनरमधील मांस ‘गोवंशाचे’ नसून म्हशीचे असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांना कंटेनर सोडण्याची वेळ आली आहे.

प्रयोगशाळा अहवालानंतर पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात : कंटेनर सोडावे लागल्याने नामुष्की

जालना :  दोन दिवसांपूर्वी मोठ्या गाजावाजात जप्त करण्यात आलेल्या मांसप्रकरणात नाट्यमय वळण आले असून, संबंधित तीन कंटेनरमधील मांस ‘गोवंशाचे’ नसून म्हशीचे असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांना कंटेनर सोडण्याची वेळ आली आहे.

संभाजीनगर रोड परिसरात पहाटेच्या सुमारास चंदनझीरा पोलिसांनी काही गोरक्षकांच्या मदतीने तीन कंटेनर अडवून मोठी कारवाई केल्याचा दावा केला होता. यामध्ये सुमारे सव्वाकोटी रुपयांचे मांस जप्त केल्याचे सांगण्यात आले होते. चालकांवर गुन्हे दाखल करून कंटेनर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.

मात्र सुरुवातीपासूनच चालक व संबंधित कंपनीकडून हे मांस गोवंशाचे नसल्याचा दावा करण्यात येत होता. त्यानुसार नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. अहवालात मांस म्हशीचे असल्याचे स्पष्ट होताच संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली.

या घडामोडीनंतर पोलिसांची कारवाईच वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, घाईघाईत केलेल्या कारवाईवर टीका होत आहे. दरम्यान, कंटेनर सोडवण्यासाठी राजकीय स्तरावरून दबाव आल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

या प्रकरणादरम्यान काही लोकप्रतिनिधींच्या मुलांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावत वातावरण तापवले होते. मात्र अहवाल आल्यानंतर सर्वत्र शांतता पसरल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, दोन दिवस कंटेनरमधील मांस खराब होऊ नये म्हणून कूलिंग यंत्रणा सुरू ठेवावी लागली. यासाठी सुमारे ३६ हजार रुपयांचे डिझेल खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकूणच, ‘गोमांस’ प्रकरणाचा गाजावाजा फुसका ठरला असून, या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणाची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top