dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

एलपीजी टँकरमधून गॅस चोरी करणारी टोळी गजाआड : पुरवठा विभागाची कारवाई, 1.26 कोटींचा मुद्देमाल जप्त | Gang stealing gas from LPG tanker busted

Gang stealing gas from LPG tanker busted : एलपीजी टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला जिल्हा पुरवठा विभाग आणि राज्यस्तरीय भरारी पथकाने धडक कारवाई करीत गजाआड केले. 

छत्रपती संभाजीनगर : एलपीजी टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला जिल्हा पुरवठा विभाग आणि राज्यस्तरीय भरारी पथकाने धडक कारवाई करीत गजाआड केले. ही कारवाई गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात असलेल्या हॉटेल साई यशच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात गुरुवार, 2 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एलपीजी वाहतूक करणारे दोन टँकर, १७ भरलेले आणि ६ रिकामे सिलेंडर, तसेच काही घरगुती आणि ५ किलोचे छोटे सिलेंडर असा एकूण 1 कोटी 26 लाख 87 हजार 99 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक श्रीकृष्ण सखाराम दहिफळे, श्रीहर छेदी, मिराज मोहम्मद जैश खान, व्यवसायाचा मालक महेश विष्णू थोरात अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलपीजी वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अवैधरित्या गॅसची चोरी करण्यात येत असल्याची माहिती राज्यस्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. अन्न नागरी पुरवठा विभागाचे संचालक चंद्रकांत डांगे, गणेश बेल्लाळे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय भरारी पथक आणि छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, सागर सिंगल, हिदायत खान, इरफान पटेल, अमोल कासार, संदीप मोरे, पांचाळ, रामेश्वर लोखंडे यांच्यासह पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारातील हॉटेल साई यशच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात छापा मारला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top