BJP wins in Chhatrapati Sambhajinagar ZP : बहुमताच्या आकड्यापासून दूर असतांना गेल्या महिन्यात भाजपाने जिल्हा परिषदेत स्वबळावर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवडणूक जिंकली. गुरूवार दि.2 दुपारी झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीतही भाजपाने बाजी मारली आहे.

अर्थ व बांधकाम सभापती
मित्रपक्ष राष्ट्रवादीला मिळाले समाजकल्याण सभापतीपद
छत्रपती संभाजीनगर : बहुमताच्या आकड्यापासून दूर असतांना गेल्या महिन्यात भाजपाने जिल्हा परिषदेत स्वबळावर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवडणूक जिंकली. गुरूवार दि.2 दुपारी झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीतही भाजपाने बाजी मारली आहे. एकूण चार पैकी तीन सभापतीपदे आपल्याकडे तर एक मित्रपक्ष राष्ट्रवादीला देऊन भाजपाने जिल्हा परिषदेतील संपूर्ण सत्ता हस्तगत केली आहे.

शिक्षण व आरोग्य सभापती
18 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली. एकूण 63 सदस्यांचे संख्याबळ असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाचे 23, पुरस्कृत 2 आणि एक काँग्रेसमधून भाजपात आल्याने एकूण 26 सदस्यांचे संख्याबळ होते. बहुमतासाठी 32 सदस्यांची आवश्यकता असतांना आणि भाजपाकडे हा बहुताचा आकडा गाठण्यासाठी 6 सदस्य कमी असतांना त्यांनी राष्ट्रवादीच्या चार सदस्यांच्या साथीने ही निवडणूक जिंकली.

महिला व बालविकास सभापती
दुसरीकडे विरोधी पक्षाचे काही सदस्य अज्ञातवासात ठेवून बहुमताचा आकडा कमी करण्याची अटकल खेळण्यात आली. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील महालगांव सर्कलमधून निवडून आलेले अविनाश गलांडे अध्यक्ष तर फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील जितेंद्र जैस्वाल यांची उपाध्यक्षपदी वण लागली.

समाजकल्याण सभापती
जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापतीपदांची आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्येही भाजपाने बाजी मारली. एकूण चार पैकी तीन भाजपाला तर एक राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला अशी सभापतीपदांची वाटणी झाली आहे. अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य, महिला व बालविकास आणि समाजकल्याण विभाग अशा चार सभापतीपदांचा यात समावेश आहे. अवघ्या चार सदस्यांच्या जोरावर एक सभापतीपद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंद पहायला मिळत आहे. तुर्तास महिला व बालविकास आणि समाजकल्याण विभागाच्या सभापतींची नावे जाहीर झाले आहेत. मात्र अर्थ व बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य समिती सभापतींची नावेही अनैपचारिकरित्या जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यांना जिल्हा परिषदेत होणाऱ्या विशेष बैठकीमध्ये अधिकृत खातेवाटप केले जाणार आहे.
हे आहेत नवीन सभापती
(1) सचिन गरड, अर्थ व बांधकाम, भाजपा, वडगांव कोल्हाटी, ता.गंगापूर (2) अनिता मेोठे, शिक्षण व आरोग्य, भाजपा, केन्हाळा, ता. सिल्लोड (3)मिनाक्षी पवार, महिला व बालविकास, भाजपा, हतनूर, ता. कन्नड (4) बालाजी सोनटक्के, समाजकल्याण विभाग, राष्ट्रवादी, वाळुज बू, ता. छत्रपती संभाजीनगर
विरोधक उपाशी की तुपाशी?
शिवसेना शिंदे गटाकडे 22 आणि उबाठाकडे 9 सदस्य असतांना हे पक्ष बॅकफूटवर का खेळत होते हा प्रश्न उपस्थित होतोय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीतही उबाठाचे सदस्य गैरहजर राहिले परिणामी भाजपाकडे नसलेला बहुमताचा आकडा पूर्ण झाला. त्यामुळे उबाठाने त्यांना जिंकवले का? असा सुध्दा प्रश्न उपस्थित होत आहे. बहुमत नसतांना जिल्हा परिषदेतील संपूर्ण सत्ता भाजपाकडे गेल्याने विरोधक खरच उपाशी आहेत की सत्तेच्या बदल्यात तुपाशी आहेत? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.


