Chhatrapati Sambhajinagar : भरधाव वेगाने जाणाऱ्या महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ओंकार रायभान खनसे (२२ वर्ष), रा.वाळूज हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला. हा अपघात बुधवार, 1 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बारापुल्ला गेटजवळील लक्ष्मी कॉलनीकडे जाणाऱ्या दर्ग्याजवळ घडला.

छत्रपती संभाजीनगर : भरधाव वेगाने जाणाऱ्या महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ओंकार रायभान खनसे (२२ वर्ष), रा.वाळूज हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला. हा अपघात बुधवार, 1 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बारापुल्ला गेटजवळील लक्ष्मी कॉलनीकडे जाणाऱ्या दर्ग्याजवळ घडला.
ओंकार खनसे हा तरुण स.भु. महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. बुधवारी दुपारी कॉलेज सुटल्यावर तो दुचाकीने आपल्या घराकडे जात होता. बारापुल्ला गेट मधून निघाल्यावर हाकेच्या अंतरावर असलेल्या दर्ग्याजवळ त्याच्या दुचाकीस समोरुन येणाऱ्या कचऱ्याच्या डंपरने धडक दिली. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने ओंकार खनसे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गंभीर जखमी झालेल्या ओंकार खनसे याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी डंपर चालक आरोपी शेख जमील शेख नासेर (३८ वर्ष) याच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघताचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन गाडेकर करीत आहेत.


