dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ग्राम रोजगार सेवकांचे कामबंद आंदोलन सुरू | Gram Rozgar Sevaks

Gram Rozgar Sevaks : ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाबाबत ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ग्राम रोजगार सेवक संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार मानोरा तालुक्यात १ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

मानोरा : ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाबाबत ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ग्राम रोजगार सेवक संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार मानोरा तालुक्यात १ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, रोजगार हमी योजनेतील महत्त्वाचा घटक असतानाही ग्राम रोजगार सेवकांना गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. शासनाने दरमहा ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये डेटा पॅक देण्याचा निर्णय घेतला असला तरी १७ महिन्यांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे शासनाने तातडीने निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय द्यावा, या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.  निवेदन देताना तालुका अध्यक्ष पंडीत राठोड, उपाध्यक्ष कैलास जाधव, सचिव मधुकर चक्रनारायण यांच्यासह तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top