Chhatrapati Sambhajinagar : सातारा परिसरातील श्री सावरिया ऑटो गॅरेज ॲण्ड वॉशिंग सेंटरला अचानकपणे आग लागून दोन दुचाकी वाहने जळून खाक झाले. ही घटना मंगळवार, 31 मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी बुधवार, 1 एप्रिल रोजी दिली.

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील श्री सावरिया ऑटो गॅरेज ॲण्ड वॉशिंग सेंटरला अचानकपणे आग लागून दोन दुचाकी वाहने जळून खाक झाले. ही घटना मंगळवार, 31 मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी बुधवार, 1 एप्रिल रोजी दिली.
सातारा पोलिस स्टेशनजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ सावरिया ऑटो गॅरेज ॲण्ड वॉशिंग सेंटर आहे. मंगळवारी रात्री अकरा गॅरेजमधून अचानकपणे धूर येत असल्याचा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी या घटनेची माहिती गॅरेज चालक दीपक इंदोरीया व अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डयुटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे, अग्निशामक जवान छत्रपती केकान, गोपीचंद मोरे, मुजफ्फर, दुषाज आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत गॅरेजमधील दोन दुचाकी आणि इतर साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून गॅरेजला शॉर्टसर्कीटने आग लागली असावी असा संशय अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अशोक खांडेकर यांनी व्यक्त केला आहे.


