Bhaskar Sonawane : माहोरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भास्कर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच गजानन लहाने आणि इतर सदस्यांच्या सहमतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

माहोरा : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भास्कर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच गजानन लहाने आणि इतर सदस्यांच्या सहमतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीनंतर समर्थकांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला.
माहोरा येथे शुक्रवार, 27 मार्च रोजी आयोजित विशेष सभेत विस्तार अधिकारी बी. ई. वाघमारे, सरपंच गजानन लहाने, पंचायत अधिकारी रावसाहेब दांडगे, माजी उपसरपंच बाबासाहेब बोरसे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतीत स्पष्ट बहुमत असल्याने भास्कर सोनवणे यांचा मार्ग सुकर झाला आणि त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते भगवान लहाने, प्रभाकर शहागडकर, माजी सभापती चंद्रकांत चौतमोल, भानुदास बोर्डे, कैलास लहाने, हर्षल जाधव, सैय्यद मुन्सी, चंद्र सिरसाठ, सुखदेव साबळे, माजी उपसरपंच सय्यद हबीब सय्यद कमाल, सय्यद दिलावर, सुभाष देशमुख, दादाराव गडकरी, वामन लहाने, सुरेश जाधव, गणेश पगारे, लक्ष्मण वाघ, संतोष बोर्डे, राहुल सोनवणे, संदीप साळवे, नितीन इंगळे, धम्मदीप काळे, साहेबराव बोर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आता नव्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
– विकासाला गती देणार
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना, सरपंच गजानन लहाने, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवेन, गावाचा सर्वांगीण विकास करणे आणि गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, हीच माझी प्राथमिकता असेल, असे नूतन उपसरपंच भास्कर सोनवणे यांनी सांगितले.


