dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गॅस टंचाई, काळाबाजार विरोधात शिवसेना आक्रमक; अंबादास दानवेंच्या तत्परतेने अवैध विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल | Gas Shortages and Black Marketing

Gas Shortages and Black Marketing : गॅस सिलेंडरचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शुक्रवार,  27 मार्च रोजी आक्रमक आंदोलन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर :  शहरात घरगुती व व्यावसायिक गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, गॅस सिलेंडरचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शुक्रवार,  27 मार्च रोजी आक्रमक आंदोलन करण्यात आले.

शहरातील तब्बल 23 गॅस एजन्सींना निवेदन देत, चढ्या दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सी धारकांना जाब विचारण्यात आला. घरगुती व व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच विक्री करावी, काळाबाजार तात्काळ थांबवावा, तसेच नागरिकांना वेळेवर होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध करून द्यावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, मयूर पार्क परिसरात भारत गॅस एजन्सीची एक गाडी शिवसैनिकांनी पकडली. निवासी भागात अवैध पद्धतीने गॅस सिलेंडरची विक्री सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वाती स्वप्नील खाडे-केदार यांनी कारवाई करत, अवैध विक्री व चढ्या दराने गॅस विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही गाडी शिवसेना मध्य शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी पकडली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top