dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; ४ गंभीर जाफ्राबाद रोडवरील घटना | Head-on Collision Between Two-wheelers

Head-on Collision Between Two-wheelers : जाफ्राबाद रोडवर शुक्रवार, २७ मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अकोलादेव : जाफ्राबाद रोडवर शुक्रवार, २७ मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींमध्ये जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील तीन जणांचा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाचा समावेश आहे.

संजय हिवाळे (४५), रामदास घोरपडे (६०), संभाजी घोडे (२५) तिघेही रा. गाडेगव्हाण, ता. जाफ्राबाद तर बुलढाणा जिल्ह्यातील एक युवक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची मिळालेली अशी की, गाडेगव्हाण येथील तिघेजण मोटारसायकलवर (एमएच २१ सीडी ६४ १२) जाफ्राबादवरुन टेंभुर्णीकडे येत असताना मोटरसायकल (एमएच २८, ५५०९) ही जाफ्राबादकडे जात असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन हा अपघात झाला. जाफ्राबाद रोडवरील पोदार इंग्लिश स्कूलजवळ ही घटना घडली. दोन्ही दुचाकी भरधाव वेगात होत्या. दुचाकींची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून, चालक आणि पाठीमागे बसलेले रस्त्यावर फेकले गेले. हा अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चारही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेने जवळच्या टेंभुर्णी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेचा जाफ्राबाद पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top