dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आईचा एकुलता एक आधार गेला; 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या | youth commits suicide by hanging himself

youth commits suicide by hanging himself : रिसोड  तालुक्यातील मोठेगाव येथे एका 23 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार,  27 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. विजय गजानन कष्टे असे मृत युवकाचे नाव आहे.

रिसोड  : तालुक्यातील मोठेगाव येथे एका 23 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार,  27 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. विजय गजानन कष्टे असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय हा गुरुवारी रात्री घरी परतला नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या आईने सकाळी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावालगत असलेल्या गोठ्याजवळ त्याची दुचाकी उभी दिसल्याने संशय बळावला. गोठ्यात डोकावून पाहिले असता विजयने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच आईने एकच आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, विजय हा आईचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून दोन्ही बहिणींचे लग्न झालेले आहे. अशा परिस्थितीत एकुलता एक आधार हरपल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top