Silver-Winning Maharashtra Team : फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत चंदीगड(पंजाब)येथे संपन्न झालेल्या ५ व्या खेलो मास्टर्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रजत पदक Silver Medal पटकावले.

बुलढाणा :’फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत चंदीगड(पंजाब)येथे संपन्न झालेल्या ५ व्या खेलो मास्टर्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रजत पदक Silver Medal पटकावले. राज्याला हा मान मिळवून देणारे राज्य समन्वयक गोवर्धन राठोड आणि हॉलीबॉल संघाचे कर्णधार किशोर वाघ यांच्यासह सर्व खेळाडूंचे बुलढाणा येथे शिक्षक भारतीचे अध्यक्ष सुरेश देवकरआणि करिअर कौन्सिलर शिशिर उर्फ अण्णासाहेब पाटील यांच्या वतीने स्वागत आणि यथोचित सन्मान करण्यात आला.
फिटनेसचा मंत्रा:आपल्या मनोगतात कर्णधार किशोर वाघ यांनी’चलो चले फिटनेस की ओर’ ही संकल्पना मांडतांना सर्वसामान्यांनी खेळ आणि व्यायामाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे. ‘खेलकूद अपनाओ,स्वस्थ मस्त जीवन पाओ’हाच निरोगी आयुष्याचा मंत्र अंगिकारावा,असे आवाहन केले.या गौरव सोहळ्याला खेळाडू सर्वश्री मनोहर म्हळसने,किरण आखाडे, आसाराम सुसर,अंबादास खरात,कृष्णा पिसे,गजानन वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर यांनी शिक्षक खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक करताना म्हटले की, क्रीडा क्षेत्रात अशा यशाने राज्याचा नावलौकिक वाढतो, जो शिक्षक बांधव आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमामुळे बुलढाणा परिसरात क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाचे आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून,विजेत्या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.सत्कार समारंभाचे प्रास्ताविक आसाराम सुसर तर आभार प्रदर्शन अंबादास खरात यांनी केले.


