घरगुती गॅसचा सर्रासपणे व्यावसायिक वापर : जिल्हा पुरवठा विभागाने केली कारवाई ; ३० घरगुती गॅस सिलेंडर जप्त 

जालना :  घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा जालना शहरात आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सर्रासपणे व्यावसायिक वापर केला जात आहे. दरम्यान, सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने मोहीम सुरू केली असून या मोहिमेत अनेक हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. शुक्रवार, 13 मार्च रोजी पुरवठा विभागाने केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 30 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. 

 शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी पुरवठा विभागाने शुक्रवारी सायंकाळी विशेष तपासणी मोहीम राबवून ३० घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. ही कारवाई जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार छाया पवार, तालुका पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव, पुरवठा निरीक्षक दीपक दंडाईत, प्रियंका टाशे व दिलीप मुळे यांनी ही कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान अंबड चौफुली, छत्रपती संभाजीनगर चौक, भोकरदन नाका परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट व इतर व्यावसायिक आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी स्वस्त दरातील घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून वापरले जात असलेले ३० घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले.

जप्त केलेले सिलेंडर संबंधित अधिकृत गॅस एजन्सीकडे सुपूर्द करण्यात येणार असून संबंधित व्यावसायिकांविरुद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कठोर कारवाई केली जाईल

सध्या आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाईच्या त्यातही गॅसच्या टंचाईबाबत    सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, जालना जिल्ह्यात घरगुती वापरासाठी असलेल्या गॅसचा मुबलक पुरवठा आहे. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने

व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

»  रामदास दौंड, उपविभागीय अधिकारी,जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »