अकोला : गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते डॉ.किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यातील जन्म प्रमाणपत्रांचा मुद्दा उचलला आहे.शुक्रवारी याच कारणास्तव अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते होते.यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त समावेत बैठक देखील घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अकोला तहसील अंतर्गत देण्यात आलेल्या ४००० जन्म प्रमाणपत्रांची १५ दिवसात स्फुटीनी होणार असून या प्रक्रियेत खोट्या शपथपत्राच्या व कागदपत्राच्या आधारे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने १ डिसेंबर २०२५ रोजी बनावट शपथपत्र व प्रमाणपत्राच्या आधारे जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्याविरोधात कारवाई करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार भाजप नेते डॉ.किरीट सोमय्या यांनी अकोला जिल्ह्याचा दौरा करत शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन
जन्म प्रमाणपत्राच्या पडताळणी संदर्भात चर्चा केली. तसेच कोणताही रहिवाशी पुरावा नसताना व खोटे शपथ पत्र लावून जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या विरोधात ही मोहीम चालूच राहणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.यावेळी महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, माजी महापौर विजय अग्रवाल, मनपा सभागृहनेता पवन महाले आदी उपस्थित होते.
राज्यातील ४३ शहरात गुन्हे दाखल
बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी आरोपीवर राज्यातील ४३ शहरात गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये मालेगाव या ठिकाणी १०४८ जणांवर जन्म प्रमानपत्रावरून गुन्हे दाखल झाले आहेत.तर पाच हजारांवर आरोपी फरार असल्याची माहिती डॉ.सोमय्या यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलतांना दिली.
१५ हजार ३९७ बोगस प्रमाणपत्र
यावेळी डॉ.सोमय्या म्हणाले की,गेल्या डिसेंबर महिन्यात आणखी एक नवीन जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे.यामध्ये बाहेरच्या प्रांतातील नागरिकांनी जन्म प्रमाणपत्रासाठी संबंधित सिस्टीम हॅक करून प्रमाणपत्र मिळवले व देशातून पळ काढला. राज्यात जवळपास १५ हजार ३९७ प्रमाणपत्र बोगस काढल्या गेल्याचे ते म्हणाले.या संदर्भात मनपा आयुक्त देखील चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.