शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा : शिवजयंती उत्सवात महापौर वंदना मगरे यांचे प्रतिपादन

जालना : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर होणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. जालनेकरांनी या दोन दिवसीय सांस्कृतिक मेजवाणीचा लाभ घ्यावा. तसेच आजच्या पिढीने शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर वंदना मगरे यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुशवार, 18 व गुरुवार, 19 फेब्रुवारी,  रोजी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष विश्वंभर तिरुखे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, अशोक पडूळ, किशोर मरकड, तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार तुषार निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहेत. शहरात पूर्वी जेव्हा वाहने नव्हती, तेव्हा शिवजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात बैलगाडीतून निघत असे. आज काळ बदलला आहे, तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. आता मोटारगाड्या आणि आधुनिक वाजंत्रीसह मिरवणुका निघतात. काळानुसार साजरीकरणाची पद्धत बदलली असली, तरी शिवरायांवरील निष्ठा तीच आहे. जयंतीच्या उत्सवापुरते मर्यादित न राहता, महापुरुषांचे उदात्त विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजच्या सोहळ्यात चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान वाटत आहे. अशा संस्कारांतूनच उद्याची पिढी घडणार आहे. असे प्रतिपादन उपमहापौर राजेश राऊत यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »