खामगाव : महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाच्या 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार खामगाव शहरात अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर लाखनवाड़ा येथे अपर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासाठी कामगार मंत्री ना. ॲड. आकाश फुंडकर यांनी सातत्याने केलेल्या मागणीला यश आले आहे.

शासकीय कार्यालयांवरील वाढता कामाचा ताण, जिल्हे तालुक्यांचा मोठा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल प्रशासन अधिक प्रभावी करणे, निर्णय प्रक्रिया वेगवान करणे व नागरिकांना वारंवार जिल्हा तालुका मुख्यालयात येण्याची गरज कमी करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निर्मितीसाठी तालुक्यांची संख्या, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, दुर्गम व आदिवासी भाग, जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरील कामकाजाचा व्याप हे निकष निश्चित करण्यात आले आहेत. महसूल वसुली, जमाबंदी, जमीन सुधारणा कायदे, अपील प्रकरणे व गौण खनिजांशी संबंधित कामांचा ताण कमी करण्यास या कार्यालयांचा मोठा फायदा होणार आहे.
राज्यात नवीन 11 अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता
अमरावती विभागात खामगांव, अचलपूर, पुसद, नागपुर विभागात 1, कोकण विभागात 2, संभाजी नगर विभागात 1, पुणे विभागात 3, नाशिक विभागात 1 असे एकूण 11 अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजूरी मिळाली आहे. त्याचबरोबर राज्यात 69 अपर तहसील कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार असून, यामध्ये खामगांव तालुक्यातील लाखनवाड़ा कार्यालयांचा समावेश आहे.
सामन्यांना मिळणार दिलासा !
खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यास मोठा प्रशासकीय दिलासा मिळणार असून घाटाखालील तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. यासोबतच लाखनवाडा, साखरखेर्डा, डोणगाव येथे अपर तहसील कार्यालयांची निर्मिती होणार असून, नागरिकांची महसूलविषयक कामे अधिक सुलभ व वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.