dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मानसिक शांती, शारीरिक स्वास्थ्यासाठी उपवास अत्यंत प्रभावी : प्रसन्नसागर महाराज

छत्रपती संभाजीनगर : उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नसून तो स्वतःच्या आत्म्याच्या जवळ राहण्याचा (उप+वास) मार्ग आहे. धावपळीच्या जगात मानसिक शांती आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी उपवास अत्यंत प्रभावी ठरतो. त्यांनी स्पष्ट केले की, उपवासाच्या काळात मनात क्रोध किंवा ईर्ष्या असेल तर तो केवळ ‘लंगण’ ठरतो; खऱ्या उपवासात मन सात्विक असणे आणि वेळ जप-तपात घालवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आचार्य प्रसन्न सागर महाराज यांनी केले.

आचार्य प्रसन्नसागर महाराज यांच्या उपस्थितीत ‘दरमहा एक उपवास’ (हर माह एक उपवास) या अनोख्या आणि आध्यात्मिक अभियानास सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यात जवळपास 2 लाख भाविकांनी दर महिन्यात एक दिवस उपसाह ठेवण्याचा सामूहिक संकल्प केला. जयपूर येथील जवाहर सर्कल येथील एंटरटेनमेंट पॅराडाइजमध्ये झालेल्या या कार्यक्रमास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आयोजन समितीचे अध्यक्ष राजीव जैन, महामंत्री आलोक जैन यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते, अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल, अभिजीत हिरप यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top