रिसोड–मेहकर मार्गावर भीषण अपघात; कृषी मंडळाधिकारी जागीच ठार, कृषी सहायक जखमी

रिसोड : रिसोड–मेहकर मार्गावर सरपखेडा फाट्याजवळ टँकर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात कृषी विभागातील मंडळ अधिकारी विलास बारबले (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रवीण पुन्नमवार (वय ३६) गंभीर जखमी झाले. ही घटना  ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास बारबले आणि प्रवीण पुन्नमवार हे दोघे दुचाकीने एकलासपूर येथून रिसोडकडे येत होते. सरपखेडा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टँकरशी दुचाकीची जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका भीषण होता की विलास बारबले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रवीण पुन्नमवार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवीण पुन्नमवार यांना उपचारासाठी रिसोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर विलास बारबले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.  अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. कृषी विभागातील जबाबदार अधिकारी असलेल्या विलास बारबले यांच्या अकाली निधनामुळे विभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »