dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

देऊळगाव राजा रोडवर नीलगाय रक्तबंबाळ अवस्थेत

जालना : देऊळगाव राजा रोडवरील वाघ्रूळ शिवारात रविवारी रात्री दोन ते तीन वाहनांच्या धडकेत एक नीलगाय गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडली. मात्र या गंभीर घटनेनंतर पोलीस व वन विभाग तब्बल तीन तास घटनास्थळी न पोहोचल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच गौरक्षकांनी तत्काळ ११२ वर कॉल करून पोलिसांना कळवले.  वन विभागाशी संपर्क साधला. मात्र वारंवार फोन करूनही कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान नीलगायच्या जिभेवर व जबड्यावर गंभीर जखमा झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. वेळ वाया न घालवता गौरक्षकांनी स्वतःच्या खर्चाने पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून जागेवरच उपचार करून टाके घातले, त्यामुळे नीलगायचा जीव वाचला.

नंतर वन विभागाचा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला, मात्र नीलगाय मोठी असल्याने हलवणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर गौरक्षकांनीच नीलगायला सुरक्षित ठिकाणी हलवले. या घटनेमुळे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top