dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महापौरपदी भाजपच्या खांडेकर; काँग्रेसचा एका मताने पराभव; चंद्रपूर मनपात ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युती

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा मंगळवारी अत्यंत नाट्यमय शेवट झाला. “कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा,” असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची चर्चा सकाळी सुरू असतानाच, दुपारी मात्र ठाकरे गटाने चक्क भाजपशी हातमिळवणी करत सर्वांनाच धक्का दिला. 

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा मंगळवारी अत्यंत नाट्यमय शेवट झाला. “कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा,” असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची चर्चा सकाळी सुरू असतानाच, दुपारी मात्र ठाकरे गटाने चक्क भाजपशी हातमिळवणी करत सर्वांनाच धक्का दिला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत फिस्कटलेले गणित आणि भाजपने दिलेली महापौरपदाची ‘ऑफर’ यामुळे चंद्रपुरात नवे राजकीय समीकरण आकारास आले आहे.

मंगळवारी चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक पार पडली. भाजपच्या संगीता खांडेकर आणि काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांच्या लढत होती. या चुरशीच्या लढतील निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांचा विजय झाला. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना ३१ मते पडली. तर संगीता खांडेकर यांना ३२ मत मिळाली. संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मताने महापौरपदी वर्णी लागली आहे. मतदानावेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक हे गैरहजर राहिले होते. तर एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने निकालावर निर्णायक परिणाम झाला.

… तर परभणीत आम्ही आमच्या सोयीने वागू

चंद्रपूरमध्ये उबाठाने भाजपाला मदत केली. चंद्रपूरमध्ये उबाठा आमच्या सोबत आली नाही,  याचा अर्थ असा काढायचा का की परभणीत आम्ही आमच्या सोयीने वागू! असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. परभणीत पण आम्ही आमच्या सोयीने वागू अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय भाजपा आणि एमआयएमची युती पुन्हा एकदा आहे, हे त्यांनी सांगून वंचित आमच्या सोबत आली नाही याबाबत खंत व्यक्त केली.

हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top