संभाजीनगरात हिट ॲण्ड रन मध्ये खामगावच्या तरूणाचा मृत्यू

खामगाव :   संभाजीनगर येथे केटरिंगचे काम करणाऱ्या खामगाव तालुक्यातील 23 वर्षीय उच्च शिक्षित तरूणाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे खामगाव तालुक्यातील लांजुळ येथे शोककळा पसरली आहे. अनिकेत दिलीप निंबाळकर (23) रा. न्यू पहाडसिंगपुरा, मुळ रा. लांजुळ, ता. खामगाव, जि. बुलढाणा असे मृत तरुणाचे नाव आहे.

अनिकेत निंबाळकर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा संलग्न समाजकार्य महाविद्यालयात एमएजडब्ल्यू या पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. सुट्टीच्या दिवशी तो विद्यापीठ परिसरातील केटरिंगमध्ये काम करीत असे. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी अनिकेतसह मनोज सदाशिव भिलन, अविनाश नितावणे, विशाल भंडारे व इतर तरुण आईसाहेब लॉन्स येथे लग्नात केटरिंगच्या कामासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर रात्री उशिरा वाहनाची कोणतीही सोय नसल्याने सर्व तरुण पायी पहाडसिंगपुराकडे निघाले. यावेळी हर्सूल जुना जकात नाक्याच्या पुढे मागून येणारी भरधाव कार क्रमांक एमएच-20-एफयू-7575 च्या चालकाने कार  निष्काळजीपणे चालवून अनिकेत निंबाळकर व मनोज भिलन यांना जोराची धडक दिली. धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले. अनिकेत निंबाळकर यास तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे 3.45 वाजता त्याचा मृत्यू झाला. मनोज भिलन याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी अनिकेतचा मामा संदीप वामन हिवराळे (41) रा. जगदीश नगर न्यु पहाडसिंगपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कार चालकाविरोधात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सचिन सदाफुले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »