dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ब्रम्हा गावात दारूबंदीचा कौल स्पष्ट; ‘आडव्या बाटली’चा दणदणीत विजय; ५२३ विरुद्ध १४ दारूबंदीला प्रचंड बहुमत

वाशिम : तालुक्यातील   ब्रम्हा येथे ऋषी रेस्टॉरंट अॅण्ड बाईन बारची अनुज्ञप्ती बंद करावी की नाही, यासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या दारूबंदी मतदानात महिलांनी ठामपणे दारूबंदीच्या बाजूने कौल दिला. मतदान प्रक्रियेनंतर झालेल्या मतमोजणीत ‘आडव्या बाटली’ला ५२३ मते मिळाली, तर ‘उभ्या बाटली’ला केवळ १४ मते पडली. याशिवाय १६ मते बाद ठरली. मोठ्या फरकाने दारूबंदीच्या बाजूने निर्णय झाल्याने ब्रम्हा गावाने व्यसनमुक्तीकडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

ही मतदान प्रक्रिया ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसिलदार ही.एस.आडे यांनी काम पाहिले. शासनाच्या तरतुदीनुसार महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरला. संध्याकाळी ६ वाजता मतमोजणी सुरू होताच काही वेळातच निकाल स्पष्ट झाला आणि दारूबंदीच्या बाजूने प्रचंड बहुमत दिसून आले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशान्वये ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडली. दारूबंदीच्या निर्णयामुळे गावातील महिलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण असून अनेकांनी हा निकाल गावाच्या सामाजिक प्रगतीसाठी ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली. आता ग्रामपंचायत ब्रम्हा हद्दीतील मद्यविक्रीची अनुज्ञप्ती अधिकृतपणे बंद करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top