dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडली. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. 

बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारीदेखील पवारांच्या गोविंदबागेत डॉक्टरांची टीम गेली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. रुबी रुग्णालयात आल्यानंतर शरद पवार कारमधून उतरून व्हिल चेअरने रुग्णालयात गेले. दरम्यान, आता शरद पवार यांच्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top