रोजगार मेळाव्यातून 105 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

छत्रपती संभाजीनगर :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, आणि युवाशक्ती फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून 105 विद्यार्थ्यांना विविध नामांकीत कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. या रोजगार मेळाव्यात 352 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, आणि युवाशक्ती फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील एस. बी. आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन स.भु. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष दीपक पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय संचालक डॉ. नंदकुमार राठी, प्राचार्य विवेक मिरगणे, प्राचार्य हसन इनामदार, डॉ. जगदीश खैरनार, डॉ. सतीश पवार, डॉ. यशवंत कलेपवार, कैलास मोरे, यांची उपस्थिती होती. या रोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून १०५ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना विविध नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तृप्ती रोंगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »