वाशिम मध्ये देशी बनावटीच्या पिस्टलसह युवक अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

वाशिम : जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक मोहिमा राबविण्यात येत असून गुंडप्रवृत्तीच्या इसमांवर कडक कारवाई केली जात आहे. सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ टाकून दहशत निर्माण करणाऱ्यांवरही सायबर पथकाची सतत नजर आहे. 

वाशिम : जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक मोहिमा राबविण्यात येत असून गुंडप्रवृत्तीच्या इसमांवर कडक कारवाई केली जात आहे. सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ टाकून दहशत निर्माण करणाऱ्यांवरही सायबर पथकाची सतत नजर आहे. अशाच कारवाईत ९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला पंचशील नगर परिसरात एक इसम देशी बनावटीची पिस्टल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पथक रवाना करण्यात आले. शोधादरम्यान संशयित जागमाता परिसरातील महादेव मंदिराजवळ आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना शिताफीने त्याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडे स्टील धातूची देशी बनावटीची पिस्टल, ब्राउन फायबर ग्रीप व मॅगझिनमध्ये दोन जिवंत राउंड आढळून आले.

चौकशीत त्याने आपले नाव पवन चिंतामण जोरेवार (वय २२, रा. पंचशील नगर, वाशिम) असल्याचे सांगितले. त्याला पुढील कारवाईसाठी वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून शस्त्र कुठून व कशासाठी आणले याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय अधिकारी नवदीप अगरवाल,  पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »