जि. प . निवडणूक : भाजपचे उमेदवार विविध ठिकाणी आघाडीवर 

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच जिल्ह्यातील विविध गटात भाजप ,  शिंदे सेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसून आले.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 63 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी शनिवार,  7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. जिल्ह्यात जवळपास 80 टक्के मतदान झाल्याने या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे मतदारांचे आणि जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून विविध तालुक्यातील मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. जशा जशा मत मोजणीच्या फेऱ्या जाहीर होत होत्या, तसतसे आघाडी घेणाऱ्या उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते जल्लोष करीत होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विविध गटातून आणि गणातून आघाडीवर असल्याचे चित्र दिसून आले. त्या पाठोपाठ शिंदे सेनेचे उमेदवार ही आघाडी घेताना दिसून आले. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसचे उमेदवार ही आघाडीवर असल्याचे विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »