खामगाव : एमआयडीसी मधील एका पुठ्ठा निर्मितीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कोठे होते रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 7 फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली.

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली भेट, नुकसानीची केली पाहणी
खामगाव : एमआयडीसी मधील एका पुठ्ठा निर्मितीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कोठे होते रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 7 फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली.
खामगाव एमआयडीसी मधील ओरिजिन पॅक कंपनी येथे कागदी पुठ्ठा निर्मिती केली जाते. सदर कंपनीला सात फेब्रुवारी रोजी रात्री अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. बघता बघता आगीने रुद्र रूप धारण केले. संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग लागताच परिसरातील इतर कारखानदारांनी कंपनीकडे धाव घेतली. तसेच आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी तातडीने नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने बंबांचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कंपनीमध्ये असलेल्या पुठ्ठ्यांच्या मालाने प्रचंड आग पकडली होती. आगीमध्ये कारखान्यातील कोट्यवधींचा माल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी एमआयडीसी भागातील घटनास्थळी भेट दिली. तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न युद्ध पातळीवर राबविल्या जात होते.
