dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अंबडमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश : एक लाख २२ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह टोळी जेरबंद

अंबड : अंबड पोलीस ठाण्याचे  पोलीस अधिकारी व कर्मचारी हे नियमित कर्तव्यावर असताना पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना माहिती प्राप्त झाली की, अंबड शहर परिसरात काही इसम भारतीय चलनातील ५०० दराच्या बनावट नोटांची खरेदी-विक्री करीत आहेत

अंबड : अंबड पोलीस ठाण्याचे  पोलीस अधिकारी व कर्मचारी हे नियमित कर्तव्यावर असताना पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना माहिती प्राप्त झाली की, अंबड शहर परिसरात काही इसम भारतीय चलनातील ५०० दराच्या बनावट नोटांची खरेदी-विक्री करीत आहेत.

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन शोध मोहीम राबविली. त्यावेळी अंबड-पाचोड रोड परिसरात संशयित इसम  विकास अनिल गडगुळ  (२६) व्यवसाय पेंटर राहणार शिवाजीनगर, महाराष्ट्रव्दार जवळ, अंबड ता अंबड जि जालना व एका विधीसंघर्षग्रस्त बालकांस ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ५०० दराच्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्या. तपास दरम्यान आरोपी विकास अनिल गडगुळ याने सदर बनावट नोटा समरवीर सुनील खरात (२१) वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, अंबड याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितल्याने त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून देखील ₹५०० दराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 

पुढील चौकशीत आरोपी समरवीर खरात याने या बनावट नोटा आकाश नारायण शेळके (२८), रा. लोढी मोहल्ला, जालना व आदित्य अमित गायकवाड (१९), रा.छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले असुन इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे. त्यानुसार पोलीस पथकाने सर्व आरोपींना शोधून पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून एकूण ५०० दराच्या २४४ बनावट भारतीय चलनी नोटा, एकूण किंमत रुपये १ लाख २२ हजार जप्त करण्यात आले. तपासात आरोपींनी बनावट चलनाचा वापर व प्रसार करण्याच्या उद्देशाने या नोटांची खरेदी-विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक बी.बी. नरोडे, पोहेकॉ मुंढे, पोहेकॉ चव्हाण  यांनी केली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 179, 180 व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top