dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘हेरा फेरी ३’ पुन्हा एकदा अडचणीत 

मुंबई :  बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी ३’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे कायदेशीर वाद आणि हक्कांचा संघर्ष. साउथ फिल्म निर्माता सेवन आर्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडने दावा केला आहे की, चित्रपटाचे हक्क खरेतर त्यांच्याकडे आहेत, निर्माता फिरोज नाडियाडवालाकडे नाहीत. या प्रकरणी त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दाक्षिणात्य निर्माता जीपी विजयकुमार यांनी २०२२ मध्ये मल्याळम चित्रपट रामजी राव स्पीकिंगच्या मूळ निर्मात्यांकडून ‘हेरा फेरी’ फ्रँचायझीचे हक्क विकत घेतले होते. त्यांचे म्हणणे आहे की, फिरोज नाडियाडवाला यांना केवळ या मूळ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याची परवानगी देण्यात आली होती, जो २००० मध्ये प्रदर्शित झाला. पण नाडियाडवाला यांनी २००६ मध्ये ‘फिर हेरा फेरी’ देखील बनवला आणि आता तिसऱ्या भागाचे हक्कही विकले आहेत, जे बनवण्याचा त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता. 

सेव्हन आर्ट्सचे एमडी विजयकुमार यांच्या मते, ‘फिर हेरा फेरी’च्या वेळी कोणीही या हक्काच्या उल्लंघनाला पकडले नव्हते, कारण पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. पण आता जेव्हा ‘हेरा फेरी ३’ ची योजना बनली, तेव्हा मूळ मालकांना हे लक्षात आले की नाडियाडवाला यांनी सिक्वेल आणि पात्रांचा वापर परवानगीशिवाय केला आहे. त्यांनी हे देखील सांगितले की नाडियाडवाला यांनी तेच हक्क अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊस कॅप ऑफ गुड फिल्म्सला विकले, ज्यांच्या विरोधात त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आणि कोर्टाचा आधार घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top