dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

यूजीसी-नेटचा निकाल जाहीर; बुलढाण्याच्या अथर्व देवकरचे उल्लेखनीय यश

बुलढाणा : यूजीसी नेट डिसेंबर २०२५ सत्रासाठी बसलेल्या लाखो उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) अधिकृत संकेतस्थळावर या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. यूजीसी नेट डिसेंबर २०२५ परीक्षेसाठी ९ लाख ९३ हजारहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामध्ये बुलढाणा येथील अथर्व सुरेश देवकर यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.

असिस्टंट प्रोफेसरशिप आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) साठी पात्रता निश्चित करण्यासाठी देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी यूजीसी नेट निकालात ‘श्रेणी ३’ (पीएचडी प्रवेश) साठी स्वतंत्र पात्रता निकष स्थापित करण्यात आले आहेत. यशस्वी उमेदवार आता देशातील शीर्ष विद्यापीठांमध्ये अध्यापन आणि संशोधन पदांसाठी पात्र आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या यूजीसी-नेट डिसेंबर 2025 परीक्षेत बुलढाणा येथील अथर्व सुरेश देवकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी राज्यशास्त्र विषयात 300 पैकी 206 गुण मिळवत 99.47 पर्सेंटाइल मिळवला आहे. या यशामुळे अथर्व सुरेश देवकर हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. देशपातळीवर होणाऱ्या या परीक्षेमध्ये अथर्वने मिळवलेले यश कौतूकास्पद आहे.

तीन श्रेणींमध्ये ठरतील उमेदवार पात्र 

यूजीसी नेट परीक्षेत तीन श्रेणींमध्ये उमेदवार पात्र ठरतील. पहिल्या श्रेणीमध्ये, उमेदवार जेआरएफ आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पात्र असतील. दुसऱ्या श्रेणीमध्ये, उमेदवार सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडी प्रवेशासाठी पात्र मानले जातील. तिसऱ्या श्रेणीमध्ये, उमेदवार पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top