dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदानाला सुरुवात; सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी 15% मतदान 

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या 63 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी शनिवार, 7  फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यात सरासरी पंधरा टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

तब्बल सात ते आठ वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असून या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत असल्याने या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजप,  काँग्रेस, एमआयएम,  वंचित बहुजन आघाडी या पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली असल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top