1 एप्रिलपासून देशात नवा आयकर कायदा लागू: आयकर स्लॅब जैसे थे

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. नवा आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. नवा आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, अशी घोषणा केली आहे. मध्यमवर्ग आणि पगारदारांचे लक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आयकरातील करसवलत वाढवून मिळणार का? याकडे होते. मात्र, निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले.

केंद्र सरकारने 2025-26 मध्ये 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत जाहीर केली होती. ही कर सवलत यंदा देखील लागू असेल. यामुळे 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त आहे. 

2026 मधील आयकराचे टॅक्स स्लॅब (न्यू टॅक्स रिजीम)

4 लाखांपर्यंत : करमुक्त

4 ते 8 लाख :5 टक्के

8 ते 12 लाख : 10 टक्के

12 ते 16 लाख: 15 टक्के

16 ते  20 लाख : 20 टक्के

20 ते 24 लाख : 25 टक्के

24 लाखांच्या पुढे : 30 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »