पैठण : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका निर्भय, मुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या वतीने व्यापक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून पिंपळवाडी (पिराची), ढोरकीन व बालानगर या गावांमध्ये पोलिसांनी पथसंचलन केले. या पथसंचलनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा संदेश देण्यात आला.

एमआयडीसी पैठण पोलिसांनी पथसंचलनादरम्यान ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, अफवा व गैरप्रकारांना आळा बसावा तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांची उपस्थिती ठळकपणे दाखविण्यात आली. गावांतील प्रमुख रस्ते, चौक व वस्ती भागांतून पथसंचलन काढत पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या पथसंचलनात सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, कविता जगताप यांच्यासह पोलीस अंमलदार कर्तारसिंग सिंगल, राहुल मोहतमल, अमोल पवार, ज्ञानेश्वर भवर, अंकुश राहटवाड, रामेश्वर पंडित, जीवन गुडेकर, रागिणी कदम, नंदा बिरुटे तसेच आरसीपीचे जवान सहभागी झाले होते.