dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ निर्दोष; एसीबीनंतर आता ईडीच्या प्रकरणातही दिलासा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) छगन भुजबळ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासाअंती आता ईडीने छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त केले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी कोणतीही निविदा न मागवता के.एस. चामणकर एंटरप्राइजेसला कंत्राट दिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. छगन भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने असा दावा केला होता की, सरकारी कर्मचाऱ्यांनी अहवालात चुकीची माहिती दिली आणि बनावट ताळेबंद तयार केले. विकासकाला 1.33 टक्के नफा होणार असल्याचे दाखवण्यात आले, मात्र, प्रत्यक्षात तो 365.36 टक्के होता, असे एसीबीचा आरोप होता. विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांना या प्रकरणी सप्टेंबर 2021 मध्ये दोषमुक्त केले होते. त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले होते की, विकासकाने भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाला 13.5 कोटी रुपये दिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. एसीबीने केलेला नफा-तोट्याचा हिशोब अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचेही कोर्टाने नमूद केले होते. कंत्राटाचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, परिवहन मंत्री आणि सात वरिष्ठ नोकरशहांच्या समितीसमोर गेला होता. त्यामुळे केवळ चुकीची माहिती देऊन या सर्वांची दिशाभूल केली गेली, हे मान्य करणे कठीण असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top