खामगाव : स्थानिक नगर पालिकेच्या निवडणुकीत सकाळी 7.30 वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. काही प्रभागातील ईव्हीएम गडबडीनंतर दुपारी 3.30 पर्यंत 48.27 टक्के मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

आज 2 डिसेंबर रोजी नगर पालिकेसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. सकाळी मात्र मतदारांकडून अल्प प्रतिसाद दिसून आला. मात्र दुपारी 1 वाजेनंतर शहरातील विविध प्रभागातील मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदान प्रक्रियेत सहभाग घेवून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील काही प्रभागामध्ये मतदान केंद्रावर चक्क उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांकडून मतदारांना मतदानासाठी घेवून येण्यात येत होते. त्यामुळे त्याठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून आक्षेप घेण्यात आल्याचे दिसून आले. मात्र शहरातील 79 मतदान केंद्रावर मतदान अधिकारीसह निवडणूक विभागाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सात कर्मचाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात आली. यावेळी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.