33 percent polling till noon for Nanded Lok Sabha : नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून आले. नांदेड जिल्हृयात दुपारपर्यंत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 33.18 टक्के मतदान झाले हेाते.
छत्रपती संभाजीनगर / नांदेड : मराठवाडयाचे लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून आले. नांदेड जिल्हृयात दुपारपर्यंत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 33.18 टक्के मतदान झाले हेाते. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31.15 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारात जोरदार रस्सीखेच असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, नांदेड जिल्हृयातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठीही बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यात 9 मतदार संघात किनवट मतदारसंघात 33.47 टक्के, हदगाव मतदारसंघात 32.07 तर भोकर मतदारसंघात 27.54 टक्के, नांदेड उत्तर 27.64, नांदेड दक्षिण 24.70, लोहा मतदारसंघात 25.03, नायगाव मतदारसंघात 31.64 टक्के, देगलूर मतदारसंघात 30.17 टक्के, मुखेड मतदारसंघात 21.73 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.