जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी तीन दिवसापासून संपावर; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

परभणी :  येथील जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी पासून जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी संपावर गेले आहेत. कामकाज बंद ठेवून आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेले उपोषण बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी देखील सुरु होते. 

चौथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित असलेल्या वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, पदनामात बदल करावा व पदोन्नतीतील साखळी कमी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या आहेत. तसेच सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, गोदावरी महामंडळ स्वायत्त करताना वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फत काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच जिल्हा परिषदेमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे समावेशन मृद व जलसंधारण विभागामध्ये करू नये, अशा इतरही मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने सामुदायिक आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर २३ फेब्रुवारीपासून कामकाज बंद ठेवून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात राज्य अध्यक्ष अशोक डहाळे, डी.आर. शेळके, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने बुधवारी कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहिर केला आहे. यावेळी राजकुमार बेलोकर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »